Home आरोग्य आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोऱ्यात भव्य महाआरोग्य शिबिर 685 रुग्णांची तपासणी,...

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोऱ्यात भव्य महाआरोग्य शिबिर 685 रुग्णांची तपासणी, 108 शस्त्रक्रियांसाठी नोंदणी

26
0
वरोरा येथील साई मंगल कार्यालयात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य महाआरोग्य शिबिरात सत्कार समारंभ. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. करण देवतळे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर नगराध्यक्ष अर्चना ठाकरे, डॉ. सागर वझे, मारोतराव घुमे व इतर मान्यवर उपस्थित.

वरोरा । प्रतिनिधी

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने १ ऑगस्ट २०२६ शनिवारी स्थानिक साई मंगल कार्यालय येथे भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर उत्साहात संपन्न झाले.
नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराची आकडेवारी:
. 685 रुग्णांची
तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी
    .108 रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी
    . 98 नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार
    . 2 व्हीलचेअर व 2 वॉकरचे गरजू दिव्यांगांना वाटप

मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाचे उद्घाटन आ. करण देवतळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे होत्या.

यावेळी डॉ. सागर वझे, रेखा तेलतुंबडे, मारोतराव घुमे, मनीषा दानव, वसंतराव विधाते, बाबासाहेब भागडे, डॉ. भगवान गायकवाड, अमित चवले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कोणते तज्ज्ञ होते?
शालिनीताई मेघे रुग्णालयाचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते. सर्जरी, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आदी शाखांतील तपासणी करून आवश्यक औषधे मोफत देण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांच्या सहकार्याने रक्त तपासणी, आभा कार्ड व आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही होती.
विशेष सत्कार
आनंदवनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ यांचा कुष्ठरुग्ण सेवेसाठी विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या सामूहिक विवाहासाठी काम करणाऱ्या आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट च्या शामबाबूजी पुगलिया व सहकाऱ्यांचाही सन्मान झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टिपले यांनी केले तर आभार तुषार किनाके यांनी मानले.
संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव व सर्व कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.-
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #SudhirMungantiwar #Warora #HealthCamp #FreeSurgery #AyushmanCard #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here