चंद्रपूर । प्रतिनिधी
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व खाजगी आणि सरकारी वाहनांवर HSRP म्हणजेच उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट लावण्याची शासनाने दिलेली अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपली आहे. याबाबत चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व वाहनधारकांना आणि सरकारी विभागांना सूचना जारी केली आहे.
केंद्रीय मोटर वाहन नियम 1989 च्या नियम 50 नुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व वाहनांवर HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे.
कारवाई काय होणार?
चंद्रपूर RTO च्या माहितीनुसार, मुदतीत HSRP न लावणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच अशा वाहनांची नावाने हस्तांतरण, पत्ता बदल, फायनान्स, डुप्लिकेट RC आणि नोंदणी नूतनीकरण ही सर्व कामे बंद करण्यात येतील.
शुल्क आणि बुकिंग
– दुचाकी: ₹531
– तीनचाकी: ₹590
– चारचाकी/इतर: ₹879 + GST
वाहनधारकांनी https://hsrpbookings.in या अधिकृत HSRP पोर्टलवर ऑनलाईन बुकिंग करून आपल्या जवळच्या फिटमेंट सेंटरवर प्लेट बसवून घ्यावी.
सिंदेवाही, मूल, गडचांदूर, राजुरा यासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी तातडीने HSRP बसवून घ्यावी, असे आवाहन चंद्रपूर RTO तर्फे करण्यात आले आहे.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #HSRP #ChandrapurRTO #Sindavahi #TrafficRule

