Home मुख्य बातम्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता 50 किलो पेक्षा जास्त वजनाची गोणी वाहू नये...

राज्यातील बाजार समित्यांमध्ये आता 50 किलो पेक्षा जास्त वजनाची गोणी वाहू नये कृषी उत्पन्न बाजार समिती, मूलचा परिपत्रक

21
0
कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल चा अतिशय महत्वाचा शासन आदेश आहे 📄हा आदेश शेतमाल हमाल आणि शेतकऱ्यांसाठी आहे.
  1. मूल । प्रतिनिधी
    शेतमाल हमालांच्या आरोग्याचा विचार करून राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा, बटाटा व इतर शेतमालाची चढउतार 50 किलो पेक्षा अधिक वजनाच्या गोण्यांमधून केली जाणार नाही.
    कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल यांनी दिनांक 30 जून 2026 रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या 15 एप्रिल 2026 च्या निर्णयानुसार आता शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलो पर्यंतच असेल.
    या निर्णयामुळे हमालांना जास्त वजन उचलण्याचा त्रास कमी होणार असून शेतमालाचे योग्य वजनमापही होणार आहे. बाजार समिती प्रशासनाने सदर शासन निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
    महत्वाचे मुद्दे:
    1.शासन निर्णय: महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने दिनांक 15.4.2026       रोजी निर्णय घेतला आहे.
    2.नवीन नियम: यापुढे राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांदा, बटाटा व इतर 3.शेतमालाची चढउतार 50 किलो पेक्षा अधिक वजनाच्या पिशव्यांमधून केली जाणार नाही.
    वजन मर्यादा: शेतमालाच्या गोणीची वजन मर्यादा 50 किलो पर्यंतच राहणार आहे. यापेक्षा     जास्त वजनाच्या गोण्या बाजारात आणता येणार नाहीत.
    4.अंमलबजावणी: हा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल यांनी दिनांक 30/6/2026 रोजी परिपत्रक काढून सर्वांना कळवला आहे.

    हा निर्णय का?
    हमालांच्या आरोग्याला धोका होऊ नये आणि
    शेतमालाची योग्य वजनमाप व्हावी यासाठी शासनाने ही
    वजन मर्यादा निश्चित केली आहे.
    पत्र क्र: कुडबास-मूल/अनुज्ञप्ती/50 किलो वजन/289/2026
    दिनांक: 30/06/2026
    स्वाक्षरी: प्र.सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, मूल जि. चंद्रपूर
    ✍️स्वामी गोलपल्लीवार
    मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

TAGS: #APMC #Mul #Chandrapur #Farmer #Hamali #50KgRule #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here