
सिंदेवाही । प्रतिनिधी
स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
सिंदेवाही शहरातून मूल कडे जाणाऱ्या डांबरी राष्ट्रीय/राज्य महामार्गाच्या बाजूला सुरू असलेल्या खोदकामाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खोदकाम करून त्याच उपसा केलेल्या मातीचा भराव टाकला जात आहे. आवश्यक त्या प्रमाणात मुरूम किंवा खडीचा वापर केला जात नसल्याने संपूर्ण कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
हायवेवर दररोज हजारो लहान-मोठी वाहने धावत असतात. मात्र रस्त्यालगत खोदले खड्डे, त्यामध्ये टाकलेली सैल माती आणि निकृष्ट भरावामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळे ही माती वाहून जात असल्याने रस्त्याच्या कडेला मोठे खड्डे तयार होत आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनांनाही अपघाताचा धोका नाकारता येत नाही.
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित ठेकेदार, अभियंते व जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. तसेच कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी तांत्रिक समिती नेमून प्रत्यक्ष पाहणी करण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Sindavahi #Mul #Highway #RoadWork #Chandrapur

