स्वामी गोलपल्लीवार – मुख्य संपादक
चंद्रपूर, 09 जुलै 2026: मूल शहर व परिसरात सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरणाच्या कामात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप भारतीय राष्ट्रीय मजदूर काँग्रेस फेडरेशन INTUC ने केला आहे.
INTUC चे जिल्हाध्यक्ष श्री. दत्तात्रय समर्थ यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे की, रस्त्याच्या कडेला नाली खोदून त्यातून निघालेली मातीच भराव म्हणून टाकली जात आहे. नियमानुसार मुरूम किंवा खडी वापरणे आवश्यक असताना साधी माती वापरल्याने पावसाळ्यात ती चिखल होते.
“वाहनांचे टायर घसरून अपघात वाढले आहेत. नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका आहे” असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मागणी: तात्काळ तांत्रिक चौकशी करून दोषींवर कारवाई आणि रस्त्यांच्या कडेला दर्जेदार मुरूम/खडीचा वापर करावा.
इशारा: कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन.
🚨 मूल येथील रस्ते कामात घोळ? 🚨
INTUC चे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांची SP कडे लेखी तक्रार
आरोप: रस्त्याच्या कडेला नालीची मातीच भराव म्हणून!
परिणाम: पावसात चिखल, अपघात वाढले
#SindewahiTimes #INTUC #Chandrapur #Mul #RoadSafety
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक,
सिंदेवाही टाइम्स


