सिरोंचा (गडचिरोली):
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
श्री कौंडिण्य महर्षि गौड कलार समाज संगठन, सिरोंचा यांच्या वतीने सिरोंचा तालुक्यात प्रथमच समाजाचे आराध्य दैवत आणि वीर योद्धा श्री सरदार सर्वाय पपन्ना गौड महाराज यांची 376 वी जयंती श्रद्धा आणि सामाजिक एकतेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.या ऐतिहासिक कार्यक्रमात समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरदार पपन्ना गौड महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या शौर्यगाथा, संघर्ष आणि समाजाप्रती असलेल्या त्यागाचे स्मरण करण्यात आले.हा कार्यक्रम श्री नारायण गौड सिलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तर श्री नागेश गौड अरिगेला आणि श्री स्वामी गौड बोंगोनी यांच्या अथक प्रयत्नातून यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक गावाला एका मजबूत संघटनेशी जोडणे हा आहे.यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री दामोदरजी अरिगेला यांनी समाजाच्या एकतेचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “समाजाच्या प्रगतीसाठी वैयक्तिक मतभेद विसरून समाज हिताला प्राधान्य देणे काळाची गरज आहे.” तर श्री विजयकुमार राजू बोंगोनी आणि श्री स्वामी मोंडी बोंगोनी यांनी युवकांना आपल्या महापुरुषांचा इतिहास जाणून घेण्याचे आवाहन केले.“एक समाज – एक संघटन – एकता हीच आमची शक्ती” हा संकल्प यावेळी घेण्यात आला. यातूनच शिक्षण, सामाजिक विकास आणि समाजसेवेचे कार्य पुढे नेले जाणार आहे. सिरोंच्यातून सुरू झालेली ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रातील गौड समाजासाठी एक नवी दिशा देणारी ठरेल.
🚩 आमचा संकल्प
एक समाज – एक संघटना – एकता हीच आमची शक्ती चला, आपण सर्व मिळून संकल्प करूया की –
🔸 समाजातील प्रत्येक कुटुंबाला संघटनेशी जोडू.
🔸 परस्पर मतभेद विसरून समाजहितासाठी एकजूट राहू.
🔸 समाजातील युवकांना संघटनेशी जोडू.
🔸 आपल्या महापुरुषांचा इतिहास आणि संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू.
🔸 शिक्षण, सामाजिक विकास आणि समाजसेवेसाठी एकत्र काम करू.
🔸 समाजाचा आवाज मजबूत आणि प्रभावी बनवण्यासाठी संघटित राहू.
– सिंदेवाही टाईम्स, सिरोंचा
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122


