Home चंद्रपूर जिल्हा मूल: राजगड फाट्याजवळ पाणीपुरवठा लाईनला मोठी गळती, रात्री युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; मुख्याधिकारी,...

मूल: राजगड फाट्याजवळ पाणीपुरवठा लाईनला मोठी गळती, रात्री युद्धपातळीवर दुरुस्ती सुरू; मुख्याधिकारी, नगराध्यक्षांसह सर्व पदाधिकारी घटनास्थळी`

32
0

मूल:* शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला राजगड फाट्याजवळ मोठी गळती लागल्याने मूल नगरपरिषदेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रात्रीच्या वेळी युद्धपातळीवर हे काम सुरू असून, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष एकताताई समर्थ यांच्यासह सर्व पदाधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून कामावर देखरेख करत आहेत.

*पदाधिकाऱ्यांची उपस्थिती*

लिकेज दुरुस्तीच्या कामावेळी नगरपरिषद मूल चे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष एकताताई समर्थ, बांधकाम सभापती प्रशांत भाऊ समर्थ, विलासभाऊ कागदेलवार, नितीनभाऊ गद्देवार आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. पाण्यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासन गंभीर असल्याचे यावरून दिसून येते.

*पाणीपुरवठ्यावर परिणाम?*

राजगड फाट्याजवळील ही मुख्य लाईन असल्याने शहराच्या काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होईल.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here