Home चंद्रपूर जिल्हा दिल्लीच्या जंतर-मंतरवर विदर्भाचा आवाज: सोनम वांगचूकच्या उपोषणाला वामनराव चटप यांचा पाठिंबा, ‘विदर्भ...

दिल्लीच्या जंतर-मंतरवर विदर्भाचा आवाज: सोनम वांगचूकच्या उपोषणाला वामनराव चटप यांचा पाठिंबा, ‘विदर्भ राज्य’ मागणीचा पुनरुच्चार

12
0

नवी दिल्ली: लद्दाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी प्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांचे दिल्लीतील जंतर-मंतरवर आमरण उपोषण सुरू असून या आंदोलनाला आता ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती‘ने जाहीर पाठिंबा दिला आहे.

‘कॉक्रोच जनता पार्टी’चे अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला ‘विराआस’चे अध्यक्ष व माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने शुक्रवारी भेट दिली.

‘विराआस’चे शिलेदार दिल्लीत: या शिष्टमंडळात युवा आघाडीचे प्रांताध्यक्ष मुकेश मासुरकर, पूर्व विदर्भ विभाग अध्यक्ष अरुणभाऊ केदार, पश्चिम विदर्भ विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. पी. आर. राजपूत, विदर्भ प्रचार प्रमुख तात्यासाहेब मत्ते आणि कोअर कमिटी सदस्या श्रीमती पद्माताई राजपूत यांचा समावेश होता.

यावेळी उपोषण स्थळावरून उपस्थितांना संबोधित करताना ॲड. वामनराव चटप यांनी ‘विदर्भ राज्य आंदोलन समिती’च्या वतीने या आंदोलनाला जाहीर समर्थन घोषित केले. “लद्दाखप्रमाणे विदर्भावरही गेल्या 65 वर्षांपासून अन्याय होत आहे. लहान राज्ये विकासाचे मॉडेल ठरली आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने लद्दाखसोबतच विदर्भ राज्याच्या निर्मितीचाही निर्णय घ्यावा,” अशी मागणी चटप यांनी यावेळी केली.

काय आहे आंदोलन? ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या वतीने अभिजित दीपके यांच्या अध्यक्षतेखाली जंतर-मंतरवर आंदोलन सुरू आहे. याच मंचावर सोनम वांगचूक हे लद्दाखला पूर्ण राज्याचा दर्जा व सहाव्या अनुसूचीच्या अंमलबजावणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. विदर्भातील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन स्वतंत्र विदर्भाचा मुद्दाही राष्ट्रीय पातळीवर ऐरणीवर आणला आहे.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स …..

9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here