Home मुख्य बातम्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘राष्ट्रपती पदका’ साठी नामांकन; BSF चे सुपुत्र श्री. तारकेशदास चौधरी...

वाढदिवसाच्या दिवशीच ‘राष्ट्रपती पदका’ साठी नामांकन; BSF चे सुपुत्र श्री. तारकेशदास चौधरी यांचा देशपातळीवर गौरव

27
0

सिंदेवाही / काश्मीर बॉर्डर, दि. 1 सप्टेंबर:
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
वाढदिवसाच्या दिवशीच ‘राष्ट्रपती सुवर्णपदका‘ साठी नामांकन होणे हा खरोखर समाजासाठी अभिमानाचा योग आहे. यापेक्षा सुंदर भेटवस्तू आयुष्यात दुसरी कोणतीच असू शकत नाही.
भारतातील सर्वात मोठे सीमा सुरक्षा दल  यांच्या वतीने प्रजासत्ताक दिन – 2027 निमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपतींचे विशिष्ट सेवा पदक (President’s Police Medal for Distinguished Service) आणि गुणवत्तापूर्ण सेवा पदक (Meritorious Service Medal) साठी नामांकन प्रक्रिया जाहीर झाली आहे.
या प्रतिष्ठित यादीत काश्मीर बॉर्डरवर देशसेवा बजावत असलेले आमचे लाडके, कर्तव्यनिष्ठ आणि युवकांचे प्रेरणास्थान सन्माननीय श्री. तारकेशदास चौधरी सर (Sub-Inspector, BSF) यांचे नाव समाविष्ट झाले आहे. त्यांनी BSF मध्ये अनेक वर्षे निस्वार्थ सेवा बजावली आहे.
श्री. तारकेशदास चौधरी सर यांचा अल्प परिचय:
भारताचे रक्षक, भारतीय योद्धा आणि समाजाला नवी दिशा दाखविनारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित आहेत. काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील सीमेवर तैनात असूनही त्यांनी सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार घेतला आहे. आम्हा युवा वर्गाचे ते मार्गदर्शक असून त्यांच्या नेतृत्वाची प्रेरणा आम्हा सर्वांना आहे.

कर्तव्याच्या वाटेवर चालता तुम्ही निर्धाराने,

देशसेवेच्या ध्यासाने जगता सतत प्रामाणिकपणे.
तुमच्या नेतृत्वाची प्रेरणा आम्हा सर्वांना,
यशाच्या शिखरावर पोहोचत राहा तुम्ही निरंतराने.

समाजाची भावना:
देश तुमच्या सेवेचा असा गौरव करत राहो आणि आम्हा सर्वांवर तुमचे प्रेम असेच कायम राहो,
हीच मनापासून सदिच्छा. तुमचे पुढील आयुष्य अशाच अनेक यशांनी उजळून निघो!
तुमच्या देशसेवेचा आणि समर्पणाचा देशाला अभिमान वाटतोय, आणि आम्हाला तुमचा!

सिंदेवाही टाईम्स परिवाराकडून श्री. तारकेशदास चौधरी सर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व राष्ट्रपती पदक नामांकनाबद्दल हार्दिक अभिनंदन! 🎂🌸💐

अशाच बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here