Home चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवात DJ ला संपूर्ण बंदी: पोलीस अधीक्षक आयुष नोपानी...

चंद्रपूर जिल्ह्यात यंदा गणेशोत्सवात DJ ला संपूर्ण बंदी: पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांची घोषणा, 200 मंडळांच्या बैठकीत निर्णय

24
0

 

🔥सिंदेवाही टाइम्स – ब्रेकिंग🔥
✍️स्वामी गोलपल्लीवार
    मुख्य संपादक, 

चंद्रपूर: आगामी सार्वजनिक गणेशोत्सव 2026 शांततापूर्ण, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड येथे आढावा बैठक पार पडली.
बैठकीचे अध्यक्ष: जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी

उपस्थित: महानगरपालिका आयुक्त अकनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, विविध मंडळांचे 200-250 प्रतिनिधी, मूर्तिकार, DJ चालक-मालक.

बैठकीतील 5 महत्त्वाचे निर्णय:
1. DJ ला संपूर्ण बंदी: यंदा गणेश चतुर्थीपासून विसर्जनापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात DJ वाजवण्यावर बंदी. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश व ध्वनी प्रदूषण नियंत्रण कायद्याचे काटेकोर पालन. DJ चालकांनी सहकार्य करावे.
2. सुरक्षा प्रथम: सर्व मंडळांनी समन्वय समिती स्थापन करावी. मंडप परिसरात CCTV कॅमेरे अनिवार्य. स्वयंसेवकांची नेमणूक करावी.
3. विसर्जनासाठी नियम: मिरवणुकीतील वाहनांवर लहान मुलांना बसवू नये. अपघात टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी.
4. पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन: DJ ऐवजी ढोल-ताशा, बँड यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन. सांस्कृतिक परंपरा जपण्यावर भर.
5.आदर्श मंडळ स्पर्धा:प्रशासनातर्फे आदर्श गणेश मंडळ स्पर्धा. सर्व मंडळांनी सहभाग नोंदवावा.
SP आयुष नोपानी यांचे आवाहन: “नागरिकांनी व मंडळांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करून उत्सव शांतता, सुरक्षितता आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करावा.”

✍️स्वामी गोलपल्लीवार
    मुख्य संपादक,
    सिंदेवाही टाइम्स
    9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here