Home सामाजिक बुध्द, फुले ,आंंबेडकरी विचारांचा वारसा दीक्षाभूमी, बोकडडोह- भूपेंद्र गणवीर

बुध्द, फुले ,आंंबेडकरी विचारांचा वारसा दीक्षाभूमी, बोकडडोह- भूपेंद्र गणवीर

46
0

बोखडडोह, दीक्षाभूमी, नागभीड दि.२३ – सांस्कृतिक संघर्ष जुना आहे. तथागत बुध्दाच्या काळापासून चालत आला. समता, बंधुभाव व न्यायाचा आहे. हा बुध्द ,फुले, आंबेडकरांचा वारसा या दीक्षाभूमीच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहात ,असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भूपेंद्र गणवीर यांनी केले.

फुले-आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी बोकडडोह येथे आयोजित बौध्द धम्म परिषद व संंविधान जागृती कार्यक्रमात गणवीर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. स्निग्धा राजेश कांबळे होत्या. तर मंचावर डॉ. मिलिंद जीवने, प्रभाकर कोडबत्तूनवार ,बल्हारशहा येथील गायत्री रामटेके सामाजिक कार्यकर्त्या वर्षा नांदगावे आदी होत्या. गणवीर पुढे म्हणाले, तथागत बुध्दांनी जगात दु:ख आहे. ते दूर करता येते. त्यासाठी दु:ख मुक्तीचा मार्ग दाखवला. हा विचार जगाला पटला. त्यामुळेच बुध्दधम्म जगात वाढत आहे. जगाला गवसणी घालत आहे. बुध्दाच्या धम्माला भारतात नवचेतना देण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्यांच्या धम्मामुळेच आपल्या प्रगतीला दिशा मिळाली.अन् वेग आला.

संविधानाच्या पहिल्या दुरूस्तीवर बोलताना गणवीर म्हणाले, संविधान लागू झाल्यावर सव्वा वर्षात न्यायालयांचे अनेक निर्णय विरोधात आले. तेव्हा कायदा मंत्री डॉ. आंबेडकर होते. त्यांनी संविधान दुरूस्तीचा निर्णय घेतला. अतिशय धिरोदत्तपणे संसदेत दोन तास बोलले विरोधकांचे सर्वमुद्दे खोडून काढले. काही दुरूस्ती मांडल्या. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र, आरक्षण आणि भूमीसूधार कायद्यांना अधिक सुरक्षा मिळाली. त्यावेळी ते नसते तर विरोधकांनी संविधान कमजोर केले असते.

ते म्हणाले, या पहिल्या संविधान दुरूस्तीला विरोध करणाऱ्यात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आघाडीवर होते. त्यांनी या दुरूस्तीला ‘असंविधानिक दानव’ संबोधले होते. त्यांना आदर्श मानणाऱ्यांचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे जाती, जमाती,ओबीसींनी सावध राहावे आणि हक्क व अधिकारांसाठी संघटितपणे लढावे, असेही आवाहन केले
डॉ.मिलिंज जीवने
दीक्षाभुमी बोकडडोह तर्फे महाड तलाव पाणी सत्याग्रह स्मृती कार्यक्रमात निसर्गाचा व्यत्यय आला. त्यामुळे पुढे ढकलण्यात आलेला कार्यक्रम आज २२ मे रोजी आयोजित आहे अशी माहिती सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेलचे राष्ट्रिय अध्यक्ष डॉ मिलिन्द जीवने ‘शाक्य’ यांनी दिली. ते म्हणाले, महाड तलाव पाण्याचा सत्याग्रह हा लढा सामाजिक समतेचा लढा होता. तथागत बुध्दाचे जीवन मिशन आणि बाबासाहेब यांचे जीवन मिशनमध्ये मानवमुक्ती एकजिनसी विचार आहे. रोहिनी नदी आणि महाड तलावाचे पाणी त्याचे प्रतीक बनली आहेत. विदर्भवादी प्रा. प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी वेगळा विदर्भाची भूमिका आकडेवारी देत प्रभावी व अभ्यासपुर्ण पध्दतीने मांडली. गणेश शर्मा, समाजसेविका वर्षा नांदगावे यांचीही भाषणे झाली. यावेळी सभामंडप खचाखच भरले होते. प्रास्ताविक डॉ एम. बी. टेंभुरकर यांनी तर आभार प्रदर्शन एड. डॉ. पी. डी. काटकर यांनी मानले. संचालन प्रा. सुरज निमगडे , प्रज्ञा निमगडे , प्रविण रामटेके यांनी केले. वैचारिकतेनंतर रात्री मी सावित्री बोलते. हा कार्यक्रम बल्हारशहा येथील गायत्री रामटेके यांनी सादर केला. त्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमाबाई महिला मंडळ, फुले आंबेडकर स्मारक समितीचे मिलिंद मेश्राम , के. डी. शेंडे , बबिता रामटेके ,उज्वला रामटेके , अरुण चव्हाण ,हिरालाल मेश्राम काजळसर , वसंता मेश्राम , विलास वानखेडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here