वरोरा येथील आरोग्य शिबिरात ६८५ रुग्णांची तपासणी; आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मिळाला दिलासा
वरोरा, 8 ऑगस्ट 2026 :- प्रतिनिधी सिंदेवाही टाईम्स
माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने 1 ऑगस्ट रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण 685 रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
त्यापैकी पुढील उपचार व शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या 120 रुग्णांची निवड करण्यात आली.
त्यापैकी 45 रुग्णांना शुक्रवार, 7 ऑगस्ट रोजी पुढील उपचार व आवश्यक शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी संस्थेच्या वतीने वाहनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संस्थेच्या वतीने केवळ तपासणी न करता, गरजू रुग्णांना थेट रुग्णालयापर्यंत पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. उर्वरित निवड झालेल्या रुग्णांनाही टप्प्याटप्प्याने उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे संस्थेचे सचिव आशिष घुमे यांनी सांगितले.
मान्यवर उपस्थिती
यावेळी चंद्रपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव विधाते, संस्थेचे उपाध्यक्ष संजय दानव, योगेश क्षीरसागर, प्रशांत साळवे तसेच स्वयंसेविका नूतन बुरडकर उपस्थित होत्या.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या आरोग्य उपक्रमाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
– प्रतिनिधी
सिंदेवाही टाईम्स
सुधीर मुनगंटीवार,
वरोरा बातमी,
आरोग्य शिबिर,
चंद्रभागाबाई घुमे संस्था,
बल्लारपूर,
सिंदेवाही टाईम्स
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

