Home मुख्य बातम्या मूल शहरातील गॅस धारक त्रस्त : 45 दिवसाऐवजी 25 दिवसात सिलेंडर मिळावा,...

मूल शहरातील गॅस धारक त्रस्त : 45 दिवसाऐवजी 25 दिवसात सिलेंडर मिळावा, आमदार मुनगंटीवारांचे केंद्राला पत्र

19
0

मूल – स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
मूल शहरातील गॅस धारकांना 45 दिवसाऐवजी 25 दिवसात गॅस सिलेंडरचा पुरवठा व्हावा यासाठी वारंवार मागणी करूनही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे गॅस एजन्सी प्रशासनाने ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल टहलियानी तसेच भाजयुमोचे उपाध्यक्ष सुरज मांडाडे यांनी केली आहे.

मूल येथील गॅस एजन्सी काही कारणाने बंद झाली होती, त्यामुळे सावली येथील एजन्सी मार्फत मूल शहरात सिलेंडर पुरवठा केला जात होता. आता मात्र मूल शहरात एजन्सी सुरू झालेली आहे. एकंदरीत मूल शहर तालुक्याचे क्षेत्र असल्यामुळे गॅसधारकांना 25 दिवसात गॅस सिलेंडर मिळायला पाहिजे. परंतु अजूनही 45 दिवसांनंतर गॅस सिलेंडर मिळत आहे.

या संदर्भात मोतीलाल टहलियानी यांनी या क्षेत्राचे आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना पत्र दिले होते. त्या अनुषंगाने मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना 6 मे रोजी आणि केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री यांना 24 जून 2026 रोजी पत्र दिले आहे. तरीसुद्धा याबत वरिष्ठ स्तरावरून कुठलीही मागणी पूर्ण झालेली नाही.

यामुळे गॅसधारकांना बऱ्याच अडचणी येत आहेत. म्हणूनच गॅसधारकांच्या अडचणी सोडविण्यासाठी या मागणीकडे तातडीने लक्ष द्यावे, असे म्हटले जाते.

– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

TAGS: #GasCylinder #Mul #Chandrapur #SudhirMungantiwar #LPG

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here