
सिंदेवाही / चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटके
लिहून आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने सदानंद बोरकर यांनी
झाडीपट्टी नाटकाला एक वेगळ्या उंचीवर पोहोचवले.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
सिंदेवाही / चंद्रपूर : झाडीपट्टी रंगभूमीवर एकापेक्षा एक सरस नाटके
लिहून आपल्या अभिनयाने आणि दिग्दर्शनाने सदानंद बोरकर यांनी
झाडीपट्टी नाटकाला एक वेगळ्या उंचीवर पोहोचवले.
त्यांचे पहिले आणि गाजलेले नाटक ‘माझं कुंकू मीच पुसलं’ या
नाटकाला २१ वर्ष पूर्ण झाली आहेत.
झाडीपट्टी, विदर्भ, मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रात या नाटकाने
इतिहास घडवला. ४-५ वर्षापासून सुरु असलेले हे नाटक आजही रसिकांच्या
मनात घर करून आहे. ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न, सामाजिक
बांधिलकी आणि वास्तववादी लेखन यामुळे हे नाटक प्रचंड गाजले.
या नाटकावर एक छोटी समीक्षा प्रा डॉ शरद मेश्राम
(जयस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव )यांनी २००८ मध्ये लिहिली होती, ती समीक्षा आजही या
नाटकाचे महत्त्व अधोरेखित करते.
भाऊसाहेब नवरतन यांनी लिहिलेल्या या लेखात ‘माझं कुंकू मीच पुसलं’
हे केवळ नाटक नसून एक सामाजिक प्रबोधन असल्याचे म्हटले आहे.
सदानंद बोरकर लिखित व दिग्दर्शित या नाटकाने झाडीपट्टीच्या नावाला
राज्यस्तरावर ओळख मिळवून दिली आहे.
अशाच सांस्कृतिक व स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

