
सिंदेवाही,✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
दि. २२ ऑगस्ट : कोहळी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक,
आर्थिक व औद्योगिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी
सिंदेवाही येथील तुलसी लॉन येथे कोहळी समाजाचा भव्य लोकप्रतिनिधी
मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.
कोहळी पाटील संघर्ष मंच, नागपूर यांच्या वतीने आयोजित या मेळाव्याला
गोंदिया, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या चारही जिल्ह्यांतून प्रचंड
संख्येने समाजबांधव उपस्थित राहिले.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. हेमकृष्ण कापगते होते.
बॅनरवर नमूद केल्याप्रमाणे ‘प्रथम समाज, नंतर पक्षधोरण – एकता,
संस्कृती, स्वाभिमान आणि प्रगती’ हा मुख्य संदेश देण्यात आला.
‘भीक नको हक्क हवा, कोहळी समाजाचा एकच दावा’ अशी घोषणा यावेळी
देण्यात आली.
यावेळी कोहळी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बाळबुद्धे,
पद्मश्री परशुराम खुणे, दिवाकर निकुरे, गंगाधर परशुरकर, अमोल
मुंगमोडे, चामेश्वर गहाने, नाना नाकाडे, सदानंद बोरकर, कांचन गहाने,
ललित बालबुद्धे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्यात “प्रथम समाज, नंतर पक्षधोरण” या भूमिकेला प्राधान्य देत
समाजाच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त
करण्यात आला. समाजाची संघटनशक्ती अधिक मजबूत करणे, युवकांना
शिक्षण व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, उद्योग व व्यवसायाला
चालना देणे व प्रलंबित मागण्यांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा
करण्याबाबत चर्चा झाली.
मेळाव्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला की, सभागृहातील जागा अपुरी
पडली. चारही जिल्ह्यांतून आलेल्या महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांच्या
उपस्थितीने मेळाव्याला अभूतपूर्व स्वरूप प्राप्त झाले.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी सिंदेवाही कोहळी पाटील संघर्ष
मंच यांनी विशेष सहकार्य केले.
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122
