Home चंद्रपूर जिल्हा सिंदेवाही टाईम्स |सिंदेवाहीत ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ कार्यक्रम उत्साहात शुभारंभ – जिल्हाधिकारी आणि...

सिंदेवाही टाईम्स |सिंदेवाहीत ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ कार्यक्रम उत्साहात शुभारंभ – जिल्हाधिकारी आणि CEO यांच्या हस्ते

22
0
सिंदेवाहीत स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण शुभारंभ 🌱
जिल्हाधिकारी वसुमना पंत मॅडम व CEO पुलकित सिंग सर यांच्या हस्ते 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!

सिंदेवाही टाईम्स | 25 सप्टेंबर 2026
स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्
ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, सिंदेवाही येथे आज दि. 25 सप्टेंबर 2026 रोजी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान (VB-G RAM G) अंतर्गत श्री. ए. एस. नायन (ऑक्सिजन मॅन) यांच्या संकल्पनेवर आधारित ‘स्वस्तिक पॅटर्न वृक्षारोपण’ जिल्हास्तरीय प्रात्यक्षिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला मा. वसुमना पंत मॅडम (जिल्हाधिकारी, चंद्रपूर) आणि मा. पुलकित सिंग सर (मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. चंद्रपूर) यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठळक मुद्दे :
* 50 ग्रामपंचायतींमध्ये 50 हजार वृक्षांचे स्वस्तिक पॅटर्नमध्ये लागवड
* 825 ग्रामपंचायतींमध्ये पुढील टप्प्यात वृक्ष लागवड आणि केशर आंबा फळबाग
* चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच यांना प्रशिक्षण
* फळबागेतून ग्रामपंचायतीला स्वतःचे उत्पन्न (OSR) मिळणार, गाव स्वयंपूर्ण होणार
श्री. ए. एस. नायन म्हणाले – “ही फक्त वृक्ष लागवड नसून वृक्ष क्रांती आहे, माझ्या 80 हजार कोटी वृक्ष लागवड संकल्पनेचा हा एक भाग आहे.”कार्यक्रमाला श्री. गिरीश धायगुडे (प्राचार्य), शुभम दांडेकर, बापू येले आणि मोठ्या संख्येने अधिकारी उपस्थित होते. आभार लक्ष्मीनारायण डोडके यांनी मानले.
– स्वामी गोलपल्लीवार, मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here