Home चंद्रपूर जिल्हा फिस्कुटी शिवारात वाघाचा हल्ला; ६६ वर्षीय शेतकरी जखमी विरई येथील दयाराम...

फिस्कुटी शिवारात वाघाचा हल्ला; ६६ वर्षीय शेतकरी जखमी विरई येथील दयाराम मोहुर्ले यांच्यावर अचानक हल्ला; सहकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

11
0

मूल :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
तालुक्यातील फिस्कुटी येथील शेतशिवारात दबा धरून बसलेल्या वाघाने विरई येथील ६६ वर्षीय शेतकरी दयाराम केशव मोहुर्ले यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. या घटनेमुळे फिस्कुटी व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दयाराम मोहुर्ले हे फिस्कुटी येथील शेतशिवारात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच त्यांचे पुत्र अमित मोहुर्ले यांनी वडिलांना तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, संजीवनी पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मय सिंह झिरे व स्वप्नील आककेवार तसेच सावली वनपरिक्षेत्रातील वनरक्षक लंकेश आखाडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी दयाराम मोहुर्ले यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच विरई येथील समाजसेवक संजय मोहुर्ले यांनीही या प्रसंगी सहकार्य केले.

परिसरात वाघाच्या हालचाली वाढत असल्याने शेतशिवारात काम करणारे शेतकरी व शेतमजूर दहशतीखाली आहेत. वनविभागाने या परिसरात वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवावे, आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here