
सोलापूर: जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसायाला आळा घालण्यासाठी सोलापूर जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागाच्या पथकाने कारवाई करून ‘टंगो पंच’ आणि ‘भिंगरी’ ब्रँडची अवैधरीत्या निर्मिती करणारा कारखाना उद्ध्वस्त केला.
या उज्ज्वल कामगिरीबद्दल जिल्हा आणि राज्य मद्य विक्रेता असोसिएशन तर्फे विभागाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
असोसिएशनच्या शिष्टमंडळाने मा. अधीक्षक सौ. भाग्यश्री जाधव मॅडम, निरीक्षक श्री. जगन्नाथ पाटील साहेब, जवान पांढरे साहेब तसेच संपूर्ण पथकाचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
व्यवसायातील समस्या मांडल्या
या भेटीदरम्यान संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या व्यवसायातील विविध समस्या अधीक्षकांसमोर मांडल्या. अशा प्रकारच्या मोठ्या कारवाया सातत्याने सुरू राहिल्यास अवैध व्यवसाय बंद होईल. त्यामुळे शासनाला महसूल मिळण्यास मदत होईल तसेच नागरिकांचे जीव धोक्यात येणार नाहीत, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
‘कारवाई सुरूच राहील’ – अधीक्षक
यावेळी बोलताना मा. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी, जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद होईपर्यंत अशा प्रकारच्या कारवाया सतत चालू राहतील असे आश्वासन दिले. नागरिकांनी देखील अवैध मद्य विक्रीबाबत माहिती असल्यास त्वरित विभागाला कळवावे असे आवाहन त्यांनी केले.
या सत्कारप्रसंगी जिल्हा संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122
—
