Home चंद्रपूर जिल्हा डॉ. गायत्री रामटेके यांच्या हस्ते महेक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

डॉ. गायत्री रामटेके यांच्या हस्ते महेक संस्थेचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

52
0

अहिल्याबाई होळकर सभागृह, उमरी येथे थाटामाटात आयोजन; ३१ मान्यवरांचा सन्मान

नांदेड / उमरी :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
दि. २२ ऑक्टोबर २०२६ रोजी महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक ता. उमरी जि. नांदेड यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ हा अहिल्याबाई होळकर सभागृह, उमरी येथे अत्यंत उत्साहात व थाटामाटात संपन्न झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध एकपात्री प्रयोगाच्या अभिनेत्री, ‘मी रमाई बोलते’ फेम, विविध पुरस्कारांनी सन्मानित सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गायत्री अनीलकुमार रामटेके (बल्लारपूर, जि. चंद्रपूर) या होत्या. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३१ मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे आयोजक महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक शेख आरीफ निमटेकर, पंचशीला वेले (केंद्रीय शिक्षिका), रेल्वे डिव्हिजन बोर्डाचे अध्यक्ष पारसमल दर्डा, उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सचिन अरमळ त्याचप्रमाणे पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन व आभार प्रदर्शन आद. शेख आरीफ निमटेकर यांनी केले.
#DrGayatriRamteke #MahekSanstha #Nanded #Umri #RajyastariyaPuraskar #MiRamaiBolte #SindewahiTimes

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

 ⚠️ तुमच्या गाडीचं इन्शुरन्स संपत आहे ⚠️
पॉलिसी संपल्यानंतर वैध इन्शुरन्स नसल्यास ₹2000 पर्यंत दंड लागू शकतो.

💡 तुमच्या वाहनासाठी नूतनीकरणाचे तपशील उपलब्ध आहेत.

त्वरित नूतनीकरण करा – काही मिनिटात पॉलिसी सक्रिय
तृतीय पक्ष विमा • अपघात कव्हर • कायदेशीर संरक्षण

👇🏻 स्विटी हिरो सिंदेवाही – 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here