Home चंद्रपूर जिल्हा *मूल नगरपरिषद ॲक्शन मोडवर: पावसाळ्यापूर्वी प्रभाग 7 ची पाहणी, नगराध्यक्ष एकता समर्थ...

*मूल नगरपरिषद ॲक्शन मोडवर: पावसाळ्यापूर्वी प्रभाग 7 ची पाहणी, नगराध्यक्ष एकता समर्थ यांच्या नेतृत्वात नियोजन*

23
0
प्रभाग क्र. 7 मध्ये पावसाळापूर्व पाहणी करताना नगराध्यक्ष एकता समर्थ, सीओ, नगरसेवक प्रशांत समर्थ, अशोक येरमे, समीक्षा कळसकर व कर्मचारी.

 

*मूल:* पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मूल नगरपरिषदेने पावसाळापूर्व नियोजनाला वेग दिला आहे. आज प्रभाग क्रमांक 7 येथे नगराध्यक्ष सौ. एकता ताई समर्थ यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष पाहणी करून नाले-गटार सफाई व पाणी निचऱ्याचे नियोजन करण्यात आले.

 

*पाहणीवेळी उपस्थित मान्यवर:*

यावेळी मुख्याधिकारी साहेब, नगरसेवक प्रशांत भाऊ समर्थ, नगरसेवक अशोक भाऊ येरमे, नगरसेविका समीक्षा ताई कळसकर, जगदीश कडसकर तसेच नगरपरिषदेची संपूर्ण टीम उपस्थित होती. प्रभागातील समस्याग्रस्त ठिकाणांची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.

 

*प्रत्येक प्रभागात नियोजन:*

“पावसाळ्यापूर्वी प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवणे हे आमचे प्राधान्य आहे. पाणी साचणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल,” असे नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी यावेळी सांगितले.

 

*📍 प्रभाग क्र. 7, मूल, जि. चंद्रपूर*

*🔗 *✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक*

 


*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here