गेवरा, सावली: गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील वैनगंगा नदी पार करून सावली वनपरिक्षेत्रात दाखल झालेल्या रानटी हत्तींचा कळप अजूनही परिसरात भटकंती करत आहे.
4 दिवसांचा प्रवास:
हा कळप गेल्या चार दिवसांपासून करोली, आकापूर, सायखेडा, पाथरी, आसोला-मेंढा तलाव आणि सायमारा परिसरात एक-एक दिवस मुक्काम करत पुढे सरकत आहे. मंगळवारी तो गोलाभुज-मुरमाडी परिसरात पोहोचल्याची माहिती वनविभागाने दिली.
वनविभाग सतर्क:
हत्तींचा कळप घनदाट जंगलाचा आधार घेत पुढे जात असल्याने वनविभागाची यंत्रणा 24×7 अलर्टवर आहे. वनाधिकारी व कर्मचारी कळपाच्या मागावर असून प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कळपाची दिशा व मार्ग याबाबत नियमित माहिती संकलित केली जात आहे.
📍 सावली, जि. चंद्रपूर
✍️ सिंदेवाही टाइम्स प्रतिनिधी
नागरिकांसाठी सूचना:
हत्तींचा कळप परिसरात असल्याने रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात जाणे टाळावे. हत्ती दिसल्यास वनविभागाला तात्काळ कळवावे.
📍 सिंदेवाही, जि. चंद्रपूर
✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
9404530122

