Home चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्यात प्लाझ्मा, मॉडिफाईड डीजे आणि लेझर लाईटवर पूर्णतः बंदी; SP आयुष...

चंद्रपूर जिल्ह्यात प्लाझ्मा, मॉडिफाईड डीजे आणि लेझर लाईटवर पूर्णतः बंदी; SP आयुष नोपाणी यांचे कडक आदेश, नियम मोडल्यास थेट गुन्हा दाखल

16
0


चंद्रपूर:✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

आगामी दहीहंडी, गोपाळकाला, पोळा, तान्हा पोळा, गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीच्या काळात सार्वजनिक शांतता, नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी अतिशय कठोर पावले उचलली आहेत.संपूर्ण जिल्ह्यात प्लाझ्मा व मॉडिफाईड डीजे साउंड सिस्टीम आणि तीव्र लेझर लाईट्सच्या वापरावर पूर्णतः बंदी घालत नियम मोडणाऱ्यांवर थेट FIR दाखल करून साहित्य व वाहने जप्त करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिला आहे.अतिरिक्त आवाजाचे डीजे, प्लाझ्मा सिस्टीम, पुकर आणि मॉडिफाईड ध्वनियंत्रणामुळे इमारतींना हादरे बसून कर्णबधिरता, लहान मुले, रुग्ण आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर, विशेषतः हृदयावर गंभीर परिणाम होतो. तसेच मिरवणुकीत वापरल्या जाणाऱ्या हाय-इंटेंसिटी लेझर आणि फ्लॅश लाईटमुळे नागरिकांच्या दृष्टीला (डोळ्यांना) कायमचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.
काय आहेत नियम?
1.औद्योगिक क्षेत्र: दिवस 75 dB / रात्र 70 dB
2.व्यावसायिक क्षेत्र: 65 dB / 55 dB
3.निवासी क्षेत्र: 55 dB / 45 dB
4.शांतता क्षेत्र: 50 dB / 40 dB
नियम मोडल्यास कारवाई:
नियम मोडणाऱ्या मंडळाच्या डीजे, लेझर लाईट आणि संबंधित वाहने तात्काळ जप्त केली जातील. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 36 चे उल्लंघन केल्यास कलम 71(2) अन्वये आयोजक, ऑपरेटर आणि वाहन मालकावर थेट गुन्हा (FIR) दाखल करण्यात येईल. याशिवाय ध्वनी प्रदूषणाचा कायदा कलम 15 आणि पर्यावरण संरक्षण कायद्यान्वयेही कारवाई होणार आहे.रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास सक्त मनाई असून, सर्व कार्यक्रमांसाठी पोलीस परवानगी बंधनकारक आहे.
“सण-उत्सवाच्या काळात उच्च तीव्रतेच्या प्लाझ्मा व मॉडिफाईड डीजे आणि लेझर लाईटमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होतो. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्ह्यात या उपकरणांवर संपूर्ण बंदी घातली आहे. सर्वांनी कायद्याचे पालन करून सण साजरे करावेत.” – आयुष नोपाणी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
दरम्यान, ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना साउंड मीटर देण्यात आले असून, पोलीस कर्मचाऱ्यांना त्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. हा निर्णय फक्त गणेशोत्सवापुरता नसून वर्षभर लागू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
#ChandrapurNews #DJBan #PlasmaDJBan #ChandrapurPolice #SindewahiTimes #GaneshUtsav2026

अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here