Home क्राईम बातम्या सिंदेवाही पोलिसांचा हातभट्टीवर छापा: डोंगरगावच्या नाल्यात 20 ड्रममध्ये लपवलेला 500 लिटर मोहा...

सिंदेवाही पोलिसांचा हातभट्टीवर छापा: डोंगरगावच्या नाल्यात 20 ड्रममध्ये लपवलेला 500 लिटर मोहा सडवा जप्त, आरोपी सुरज मेश्रामवर गुन्हा

14
0
फोटोत सिंदेवाही पोलीस पथक जप्त केलेल्या 20 निळ्या व काळ्या ड्रमसोबत उभे आहे. प्रत्येक ड्रममध्ये मोहा सडवा प्लास्टिक पिशवीत भरून ठेवला होता. जंगलातील नाल्यात लपवून हा साठा केला होता.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक,

सिंदेवाही: अवैध दारू निर्मिती करणाऱ्यांविरोधात सिंदेवाही पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मौजा डोंगरगाव शेत शिवारातील तलावाचे नाल्यामध्ये हातभट्टी मोहा दारू तयार करण्यासाठी लपवून ठेवलेला 500 लिटर मोहा फुल सडवा पोलिसांनी जप्त केला आहे.

काय घडले? दिनांक 02/07/2026 रोजी मुखबिरच्या खबरेवरून पोलीस स्टेशन सिंदेवाहीच्या पथकाने दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी छापा मारला. आरोपी नामे सुरज मेश्राम रा. पळसगाव जाट याने नाल्यात 20 प्लॉस्टीक ड्रममध्ये प्रत्येकी 25 लिटर प्रमाणे मोहा सडवा लपवून ठेवला होता.

कितीचा माल जप्त?
1. 500 लिटर मोहा सडवा किंमत रु. 25,000
2. 20 प्लॉस्टीक ड्रम किंमत रु. 10,000
3. एकूण मुद्देमाल: 35,000 रुपये

सदर प्रकरणी आरोपी सुरज मेश्राम याच्याविरुद्ध पो.स्टे सिंदेवाही येथे अप.क्र. 458/26 कलम 65 (फ) मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोणी केली कारवाई? ही कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागिय पोलीस अधिकारी ब्रम्हपुरी, पो.नि. कांचन पांडे ठाणेदार पोलीस स्टेशन सिंदेवाही यांचे मार्गदर्शनात सपोनी सतिश मेश्राम, पोहवा संजय जुगनाके, नापोअ नारायण येगेवार, चिमाजी देवकते, पोअ रतनसिंग चव्हाण, नंदकिशोर तुमराम, आफताब सय्यद व पोलीस पाटील योगेश लोंढे यांनी केली.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स …..

9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here