Home 'शिक्षण व कला' नवरगावच्या शालेय मुलांच्या जीवाला घोडाझरी नहरामुळे धोका: सुरक्षा कठडे बसवा, पालकांची प्रशासनाला...

नवरगावच्या शालेय मुलांच्या जीवाला घोडाझरी नहरामुळे धोका: सुरक्षा कठडे बसवा, पालकांची प्रशासनाला मागणी

14
0
“मुलांचा जीव वाचवा”

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक,

 

सिंदेवाही: तालुक्यातील नवरगाव येथील शेकडो विद्यार्थ्यांचे शाळेत येण्या-जाण्याचा रस्ता थेट घोडाझरी प्रकल्पाच्या नहरालगतून जातो. या नहराला कोणताही सुरक्षा कठडा नसल्याने लहान मुलांचे आयुष्य दररोज धोक्यात आहे.

काय आहे समस्या? नवरगावमध्ये भारत कॉन्व्हेंट, भारत प्राथमिक शाळा, भारत माध्यमिक शाळा, श्री ज्ञानेश कनिष्ठ आणि श्री ज्ञानेश वरिष्ठ महाविद्यालय असे 5 शैक्षणिक संस्था आहेत. या सर्व शाळांचे विद्यार्थी घोडाझरी नहराच्या काठावरूनच ये-जा करतात.

ऑगस्टमध्ये पावसाळ्यात शेत सिंचनासाठी नहराला पाणी सोडले जाते. त्यावेळी नहर पूर्णपणे भरून वाहतो आणि पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो. नहरावर एक धबधबाही आहे ज्यामुळे धोका आणखी वाढतो.

20-25 वर्षांपूर्वी सुरक्षा म्हणून तारेचे कुंपण होते, पण ते आता पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घोडाझरी विभागाकडे नहराच्या भोवती सुरक्षा कठडे उभारण्याची मागणी केली आहे.

पालकांचे म्हणणे: “पाऊस पडला की आम्ही शाळेतून येईपर्यंत जीव मुठीत घेऊन बसतो. एखादा घसरला तर सरळ नहरात जाईल. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे.”

 

#SindewahiTimes #Nawargaon #Ghodazari #StudentSafety #Chandrapur #Education

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स …..

9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here