
सिंदेवाही । प्रतिनिधी
शहरातील शिवाजी चौकाजवळ शनिवार रात्री 8.30 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणारा 18 चाकी ट्रक MH 40 CT 2090 ने अचानक नियंत्रण गमावल्याने रस्त्याच्या मधील दुभाजकावर चढला.
अपघात इतका भीषण होता की ट्रकचे पुढील आणि मागील दोन्ही बाजूचे चाके दुभाजकावर गेले आणि ट्रक अर्धवट हवेत लटकल्यासारखा झाला.
ड्रायव्हर सुखरूप
अपघाताच्या वेळी ट्रकमध्ये फक्त ड्रायव्हर होता. सुदैवाने ड्रायव्हर पूर्णपणे सुखरूप आहे. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.
अपघातामूळे काही काळ शिवाजी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांचा तपास
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रकला क्रेनच्या मदतीने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.
स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS:* #Sindavahi #ShivajiChowk #Accident #18Wheeler #BreakingNews #SindavahiTimes

