Home चंद्रपूर जिल्हा सिंदेवाही: हॉस्पिटल समोरील उघडी DP जीवघेणी, लहान मुले-जनावरांना धोका

सिंदेवाही: हॉस्पिटल समोरील उघडी DP जीवघेणी, लहान मुले-जनावरांना धोका

43
0
डॉ. सतीश चिंतावार हॉस्पिटल समोरील उघडी DP – प्रशासनाच्या दुर्लक्षाचा नमुना

MSEDCL च्या दुर्लक्षामुळे डॉ. सतीश चिंतावार
हॉस्पिटल समोरील वीज वितरण पेटीचे दार उघडे; अपघाताची भीती

सिंदेवाही, 6 ऑगस्ट 2026 :
शहरातील प्रसिद्ध डॉ. सतीश चिंतावार साहेब यांच्या हॉस्पिटलच्या समोरील भागात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची DP पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहे. DP बॉक्सचे दार तुटले असून आतले वीज तार, फ्यूज आणि इतर उपकरणे उघडी पडली आहेत.

या ठिकाणी दिवसभर रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि शाळकरी मुलांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. उघड्या DP मुळे कोणत्याही क्षणी लहान मुलगा हात लावल्यास किंवा जनावर जवळ गेल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पावसाळ्यात पाणी गेल्यास शॉर्ट सर्किट होऊन परिसरातील घरांनाही धोका निर्माण होऊ शकतो.

स्थानिक नागरिकांनी अनेकदा MSEDCL च्या संबंधित अधिकाऱ्यांना याबत तोंडी माहिती दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांची मागणी
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने DP चे दार बंद करून त्याभोवती संरक्षक जाळी लावावी आणि कायमस्वरूपी सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी*
यासाठी संपर्क साधा.

✍️ *स्वामी गोलपल्लीवार*
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here