नागपूर :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
बहुजनांचे सम्राट, क्रांतिवीर श्री पापन्ना गौड महाराज यांची ३७६ वी जयंती नागपूर जिल्हा गौड कलार समाज महासंघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला नागपूर जिल्हा गौड कलार समाज संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी क्रांतिवीर पापन्ना गौड महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
यावेळी समाजाच्या एकतेबद्दल आणि पापन्ना महाराजांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. संपूर्ण वातावरण जय गौड च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते.
नागपूर जिल्हा गौड कलार समाज महासंघाच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि समाज बांधवांचे या यशस्वी कार्यक्रमाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.
जय गौड
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

