

सोलापूर :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
सोलापूर जिल्हा गौड-कलार समाज द्वारा आयोजित सरदार सर्वई
श्री पापन्ना गौड महाराज यांची ३७६वी जयंती और श्री नारायण गुरू
महाराज यांची १७० वी जयंती निमित्त संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात
साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महापुरुषांच्या जीवनातून प्रेरणा घेत समाजोपयोगी
विधायक कार्यातून जयंती साजरी करण्याचा संकल्प येथील तरुण
पिढीने केला होता.
त्याचाच भाग म्हणून आयोजित रक्तदान शिबिरात आतापर्यंत ४२ तरुण
नवयुवकांनी रक्तदान केले असून लवकरच ही संख्या ५१ पेक्षा जास्त
होणार आहे. नेत्र तपासणी शिबिरात आतापर्यंत १४ लोकांच्या
मोतीबिंदू ऑपरेशनची संपूर्ण जबाबदारी गौड समाजाने घेतली आहे.
याशिवाय अनेक नागरिकांच्या आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात
आले होते.
समाजातील भाऊ -बहिणींच्या मोठ्या उपस्थितीने कार्यक्रम आणखीनच
यशस्वी झाला. रक्तदान करणाऱ्या सर्व दात्यांना मान्यवरांच्या
हस्ते प्रमाणपत्र आणि सुंदर भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
समाजबांधवांनी संदेश दिला की, महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी
किंवा कोणतेही शुभ कार्य अशाच विधायक सामाजिक कार्यातून साजरे
केले तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि
लहान मोठया भाऊ -बहिणींचे समस्त सोलापूर डिस्ट्रिक्ट गौड-कलार समाजाच्या
वतीने हृदयापासून आभार मानण्यात आले.
#Solapur #GoudKalalSamaj #BloodDonation #SindewahiTimes
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122
