
नांदेड / सिंदेवाही टाईम्स –
महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक (ता. उमरी, जि. नांदेड) ही गेली 17 वर्षे सामाजिक, शैक्षणिक आणि
आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. संस्थेच्या 17 व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
हा पुरस्कार सोहळा मंगळवार, दि. 20 ऑक्टोबर 2026 रोजी नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे.
प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्राची सुप्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गायत्री रामटेके यांच्या शुभहस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय पुरस्कारांची नावे –
1.राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार
2.राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार
3.राज्यस्तरीय आरोग्य सेवा गौरव पुरस्कार
4.राज्यस्तरीय पोलीस गौरव पुरस्कार
5.राज्यस्तरीय पत्रकारिता भूषण पुरस्कार
6.राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार
7.राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार
8.राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार
9.राज्यस्तरीय प्रशासन रत्न पुरस्कार
10.राज्यस्तरीय उद्योजक गौरव पुरस्कार
पुरस्काराचे स्वरूप: सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल, श्रीफळ व पुष्पहार
प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन –
आपण किंवा आपल्या परिचयातील कोणीही व्यक्तीने शिक्षण, आरोग्य, पोलीस, पत्रकारिता, समाजसेवा, शेती, कला, क्रीडा, प्रशासन किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य केले असेल, तर त्याची माहिती, कार्याचा तपशील, फोटो, वृत्तपत्र कात्रण, व्हिडिओ इत्यादीसह प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख: 10 ऑक्टोबर 2026
इच्छुकांनी आपले प्रस्ताव खालील क्रमांकावर WhatsApp करावेत.संपर्क: शेख आरिफ निमटेकर, संस्थापक – महेक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, निमटेक
मो. 7719880642
टीप: पुरस्कार निवड समितीचा निर्णय अंतिम राहील.
अशाच विधायक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122
