सिंदेवाही, 21 मे 2026: विदर्भात उष्णतेची लाट कायम असून, नागरिक हैराण झाले आहेत. बुधवारी नोंदवलेल्या तापमानानुसार ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर येथे पारा 46.4 अंश सेल्सिअसवर पोहोचला, तर गडचिरोली 46.2°C आणि वर्धा 46.0°C ने तापले.
विदर्भातील प्रमुख शहरांचे तापमान:
– ब्रह्मपुरी: 46.4°C
– चंद्रपूर: 46.4°C 🔥
– गडचिरोली: 46.2°C
– वर्धा: 46.0°C
– नागपूर: 45.6°C
– अमरावती: 44.8°C
– गोंदिया: 44.4°C
– अकोला: 43.8°C
– बुलढाणा: 39.8°C
बुलढाणा वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 43 अंशांच्या वर गेले आहे. पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
नागरिकांना आवाहन: दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, मुबलक पाणी प्यावे आणि उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जनावरांनाही सावलीत ठेवून वेळोवेळी पाणी द्यावे.
—
Tags:
#विदर्भ #तापमान #Heatwave #चंद्रपूर #नागपूर #उन्हाळा #सिंदेवाहीटाइम्स #WeatherUpdate
