Home मुख्य बातम्या शिक्षणाधिकाऱ्यांचा कागदोपत्री खेळ; आदेश कागदावर, कारवाई मात्र गायब! 🔴 कागदावर आदेशांचा पाऊस,...

शिक्षणाधिकाऱ्यांचा कागदोपत्री खेळ; आदेश कागदावर, कारवाई मात्र गायब! 🔴 कागदावर आदेशांचा पाऊस, प्रत्यक्ष कारवाईचा दुष्काळ! शिक्षणाधिकाऱ्यांचा कागदोपत्री खेळ चर्चेत!

3
0


गडचिरोली – प्रतिनिधी
शिक्षणाधिकाऱ्यांचा कागदोपत्री खेळ चर्चेत! आदेश, पत्रव्यवहार अन् निर्देशांचा खेळ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या कारभारावर सवाल!
न्यायालयाचे आदेश, उपसंचालकाचे निर्देश आणि स्वतः माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी जारी केलेली पत्रे… तरीही त्या मुजोर व हेकेखोर मुख्याध्यापकावर कारवाई केली नसल्याने इटकचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समबरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कागदपत्रांचा असाच एक कागदोपत्री खेळ समोर आला आहे. न्यायालयाचा अवमान करून सहाय्यक शिक्षकाला रुजू करून न घेणाऱ्या शाळा व्यवस्थापनाविरुद्ध केवळ कागदोपत्री खेळ सुरू असून, प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत मात्र प्रशासन सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रकरण काय आहे?
*शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग यांनी १२ फेब्रुवारी २०२५ ला निकाल कायम ठेवला.
*शिक्षणाधिकारी (माध्यमिक) वासुदेव भसे यांनी १७ जुलै २०२५ रोजी मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं.
*२४ जून आणि ८ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा १० दिवसाच्या खुलाशाची नोटीस दिली.
*प्रत्यक्षात मात्र त्या मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई नाही.
“कागदावर कारवाईचा डंका, प्रत्यक्षात मात्र शून्य? न्यायालयाचे आदेशही कागदावरच?”
असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पालक व नागरिक आक्रमक झाले असून शिक्षण विभागाच्या या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here