मूल, 20 मे 2026:* जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्याशिवाय विधान परिषदेची निवडणूक घेऊ नये, अशी मागणी मूल येथील सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार यांनी पत्रकारांशी बोलतांना केली आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडून आलेले सदस्य मतदान करतात. परंतु सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका न झाल्याने या संस्थांमध्ये लोकनियुक्त सदस्य नाहीत. अशा परिस्थितीत विधान परिषदेची निवडणूक घेतल्यास जि.प. आणि पं.स. सदस्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता येणार नाही, असे पाटील म्हणाले.
“लोकशाहीमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीला मतदानाचा अधिकार आहे. निवडणुका न झाल्याने हजारो सदस्य या अधिकारापासून वंचित राहतील. त्यामुळे प्रथम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घेऊन लोकप्रतिनिधी निवडून येऊ द्यावेत आणि त्यानंतरच विधान परिषदेची निवडणूक घ्यावी,” अशी आग्रही मागणी रुपेश पाटील यांनी केली आहे.
या मागणीकडे निवडणूक आयोगाने लक्ष द्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे
#रुपेशपाटील #मूल #विधानपरिषद #जिल्हापरिषद #पंचायतसमिती #निवडणूक #चंद्रपूर #सिंदेवाहीटाइम्स
Home क्राईम बातम्या **विधान परिषदेपूर्वी जि.प.-पं.स. निवडणुका *घ्या, अन्यथा सदस्य मतदानाला मुकणार – रुपेश पाटील...

