Home चंद्रपूर चंद्रपूर येथे गौड कलार समाजाच्या वतीने पापण्णा गौड महाराज व नारायण गुरु...

चंद्रपूर येथे गौड कलार समाजाच्या वतीने पापण्णा गौड महाराज व नारायण गुरु यांची सामूहिक जयंती उत्साहात

19
0
चंद्रपूर येथे न्यू हॉटेल विजयालक्ष्मी जवळील गौड कलार समाज कार्यालयात रेणुका माता, सरदार पापण्णा गौड महाराज व श्री नारायण गुरु यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सामूहिक जयंती साजरी करताना समाजाचे पदाधिकारी व समाजबांधव. (दि. २० ऑगस्ट २०२६

चंद्रपूर :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
गौड कलार समाजाचे आराध्य दैवत श्री पापण्णा गौड महाराज
यांची ३७६ वी जयंती तसेच फिलॉसॉफर नारायण गुरु यांची १७० वी जयंती
रेणुका माता यांचे पूजन चंद्रपूर येथे गौड कलार समाज मंडळाच्या
वतीने गुरुवारी, दि. २० ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिमय
वातावरणात सामूहिकरीत्या साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून विदर्भ अध्यक्ष नारायण सिलेवार यांनी
मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फिल्म प्रोड्युसर व्यंकटेश
बालसनीवार होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन वेंकट येरोलवार, राजुरा
यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री पापण्णा गौड महाराज यांच्या प्रतिमेला
मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन
करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. महिला पदाधिकाऱ्यांनी स्वागतगीत
व आरती सादर केली.
यावेळी नारायण सिलेवार यांनी पापण्णा गौड महाराज तसेच नारायण गुरु
यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी
एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. आरमोरीचे सहसचिव गणेश बैरवार
यांनीही आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाला डॉ. राजू गौड सुरगोनी, गणेश गादगोनीवार, रामलू बालसनीवार,
चंद्रया गुटीपर्ती, बालय्या सिलेवार, माजी अध्यक्ष अंजयाजी मुसनमवार,
समाज संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गुरमवार, माजी उपाध्यक्ष केशवराव
आंबटवार, महेश श्रीकोटवार, श्रीकांत ओलालवार, गणेश बहिरवार, व्यंकटेश
परास्वामी, सुमन मरपर्लीवार, रवी बंडीवार, नरेश मारका, सुभाष कोकुलवार,
महेश गड्डमवार, रवी घंटलवार, परशुराम गोटापर्तीवार यांच्यासह पदाधिकारी
व महिला आघाडीच्या अध्यक्षा अर्चना श्रीकोटवार, लता कोकुलवार,
राजश्री बत्तीनवार, डॉ. स्वाती मरपल्लीवार आदी हजारो समाजबांधव
उपस्थित होते.
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके |
कार्यक्रम प्रसिद्धी यासाठी संपर्क साधा.
✍️ स्वामी गोलपल्लीवार

मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
📞 9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here