Home चंद्रपूर जिल्हा पावसाळा आला पण घर नाही! सिंदेवाहीतील 188 घरकुलं निधीअभावी अर्धवट

पावसाळा आला पण घर नाही! सिंदेवाहीतील 188 घरकुलं निधीअभावी अर्धवट

25
0

सिंदेवाही टाइम्स | स्थानिक बातमी
दिनांक: 18 जून 2026

निधीअभावी स्वप्न भंगले! सिंदेवाहीत 188 घरकुलांची कामे पावसाळ्याच्या तोंडावर अर्धवट

– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

प्रतिनिधी, सिंदेवाही
स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या सिंदेवाही शहरातील 188 कुटुंबांसमोर सध्या मोठं संकट उभं ठाकलं आहे. शासनाच्या घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरांची कामे निधीअभावी अर्धवट अवस्थेत अडकून पडली आहेत.

पावसाळ्याच्या तोंडावर लाभार्थी हवालदिल
वर्षभरात सिंदेवाही शहरात 188 घरकुले मंजूर झाली होती. अनेक लाभार्थ्यांनी स्वतःची जमापुंजी लावून, काहींनी कर्ज काढून तर काहींनी मजुरी करून बांधकामाला सुरुवात केली. त्यांचं स्वप्न होतं की पावसाळा सुरू होण्यापूर्वी स्वतःच्या घरात प्रवेश करायचा.

मात्र, शासनाकडून पहिलाच हप्ता न मिळाल्याने पुढील बांधकाम पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता ही कुटुंबे भाड्याच्या घरात किंवा दुसऱ्याच्या आधाराने राहत आहेत.

प्रशासन काय म्हणतंय?
पंतप्रधान आवास योजनेच्या प्रमुख दीपलता पाथोडे यांच्या म्हणण्यानुसार, निधी मिळण्याबतची प्रशासकीय कार्यवाही वेगाने सुरू आहे. संपूर्ण घरकुलांची यादी संबंधित वरिष्ठ विभागाकडे पाठवण्यात आली आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला व दुसरा हप्ता जमा केला जाईल.

लाभार्थ्यांचा सवाल:
“धनादेश नेमके केव्हा मिळणार?” असा प्रश्न आता प्रत्येक लाभार्थी विचारत आहे. पावसाळा डोक्यावर आला आहे, पण अर्धवट भिंती आणि उघडे छत पाहून कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.

संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देऊन 188 कुटुंबांचं घराचं स्वप्न पूर्ण करावं, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here