📍 चंद्रपूर, महाराष्ट्र
✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
चंद्रपूर: नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बेकायदेशीर मेडिकल स्टोअर्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी राज्यभरातील सर्व फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन अधिकाऱ्यांना थेट आदेश दिले आहेत.
कडक आदेश काय आहेत?
1. फार्मासिस्ट नसलेली दुकाने सील: ज्या मेडिकल दुकानात डिग्रीधारी फार्मासिस्ट हजर नाही, ती दुकाने तात्काळ सील करण्याचे आदेश.
2. प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री बंद: अँटिबायोटिक, स्टेरॉईड सारखी “Schedule H” औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकणाऱ्यांवर गुन्हा दाखल.
3. रँडम तपासणी: जिल्हा औषध निरीक्षकांनी रोज रँडम तपासणी करून कारवाईचा अहवाल वरिष्ठांना पाठवावा.
सिंदेवाही-चंद्रपूरसाठी महत्वाचं:
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात 10वी-12वी पास मुले मेडिकल चालवत आहेत. आयुक्तांच्या या आदेशानंतर अशा दुकानांवर कारवाईची टांगती तलवार आहे. रुग्णांनीही औषध घेताना “फार्मासिस्ट आहे का?” हे नक्की विचारावे.
नागरिकांसाठी सूचना:
बिल न देणारी, सीलबंद पॅकिंग फोडून गोळ्या देणारी, प्रिस्क्रिप्शन न मागणारी मेडिकल दिसल्यास तात्काळ 1800-22-2336 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करा.
📍 चंद्रपूर, महाराष्ट्र
✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक
🚨 मोठी बातमी: मेडिकल दुकानांवर कडक कारवाई! 🚨
“फार्मासिस्ट नसलेली मेडिकल दुकाने सील करा!”
FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांचा आदेश.
चंद्रपूर-सिंदेवाहीतील रुग्णांनो, औषध घेताना फार्मासिस्टची डिग्री आणि प्रिस्क्रिप्शन नक्की बघा. आरोग्याशी तडजोड नको!
बेकायदेशीर दुकान दिसल्यास 1800-22-2336 वर तक्रार करा 📞
#MedicalStore #FDA #TukaramMunde #Chandrapur #Sindewahi #HealthAlert #SindewahiTimes

