*सिंदेवाही टाइम्स | तातडीची सूचना ⛔*
*अपडेट: 8 जून 2026, 8:15 PM*
**✍️ *स्वामी गोलपल्लीवार* *मुख्यसंपादक*
*सिंदेवाही टाइम्स*
*मूल:* चंद्रपूर जिल्ह्यातील वन्यप्राणी संकट पुन्हा एकदा समोर आलं आहे. सावली शहरात आज दिवसभर मुक्काम केलेल्या सुमारे *30 हत्तींच्या कळपाने* आता मूल तालुक्यात प्रवेश केला आहे.
*सद्यस्थिती:*
वन विभागाच्या माहितीनुसार हा कळप सावलीतून भोवरला मार्गे मूल तालुक्यात शिरला आहे. कळपात लहान पिल्लेही असल्याने हत्ती अधिक आक्रमक होऊ शकतात.
*वन विभागाची सूचना:*
1. कोणीही हत्तींच्या जवळ जाऊ नये, सेल्फी/व्हिडिओसाठी धावू नये
2. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, एकटे शेतात जाऊ नये
3. टॉर्च, फटाके, काठी जवळ ठेवा – पण हल्ला करू नका
4. हत्ती दिसल्यास तात्काळ आरडाओरडा न करता शांतपणे दुसऱ्या मार्गाने निघून जा
*संपर्क क्रमांक:*
हत्ती दिसल्यास तात्काळ वन विभागाला कळवा:
*1926 – वन मदत क्रमांक / स्थानिक वनरक्षक*
*शेतकऱ्यांना विनंती:*
मूल, भोवरला, सावली परिसरातील शेतकऱ्यांनी रात्री शेतात मुक्काम करू नये. पिकांची काळजी नंतर घ्या, आधी जीव वाचवा.
*📍 मूल तालुका, चंद्रपूर*
*✍️ स्वामी गोलपल्लीवार, मुख्यसंपादक*
*सिंदेवाही टाइम्स*


