Home चंद्रपूर जिल्हा MSEB च्या मनमानी विरोधात प्रहारचा आवाज – प्रफुल्ल तुम्मे आक्रमक!

MSEB च्या मनमानी विरोधात प्रहारचा आवाज – प्रफुल्ल तुम्मे आक्रमक!

28
0

पाथरी MSEB कार्यालयात कर्मचारी गायब, वाढीव बिलाने जनता त्रस्त – प्रहारचा आंदोलनाचा इशारा

पाथरी / सिंदेवाही :✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
पाथरी येथील शाखा कार्यालय सिंदेवाही ग्रामीण (MSEB) येथील मनमानी कारभाराविरोधात प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाला आहे.आज शुक्रवार बाजार दिवशी परिसरातील अनेक नागरिक वाढीव वीज बिलाच्या दुरुस्तीसाठी आणि स्मार्ट मीटरच्या तक्रारी घेऊन MSEB कार्यालयात आले असता कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हता, हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागरिकांच्या परवानगीशिवाय जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसविले जात असून वाढीव बिलामुळे जनता त्रस्त आहे.या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुका अध्यक्ष सावली प्रफुल्ल रा. तुम्मे (पाथरी) यांनी नागरिकांची बाजू घेतली आहे. “ही साथ अशीच राहू द्या, विकासाचा प्रवास एकत्र पुढे घेऊन जाऊया! आपल्या विश्वास, साथ आणि प्रेमाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!” असे म्हणत प्रफुल्ल तुम्मे यांनी जनतेचे आभार मानले असून MSEB च्या अधिकाऱ्यांना सळो की पळो करण्याचा इशारा दिला आहे.लवकरच MSEB कार्यालयावर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असे शिवसेना च्या वतीने सांगण्यात आले.

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️ स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

⚠️ _तुमच्या गाडीचं इन्शुरन्स संपत आहे_ ⚠️
 पॉलिसी संपल्यानंतर वैध इन्शुरन्स नसल्यास ₹2000 पर्यंत दंड लागू शकतो.

💡 तुमच्या वाहनासाठी नूतनीकरणाचे तपशील उपलब्ध आहेत.

 त्वरित नूतनीकरण करा – काही मिनिटात पॉलिसी सक्रिय
 तृतीय पक्ष विमा • अपघात कव्हर • कायदेशीर संरक्षण

👇🏻 _स्विटी हिरो सिंदेवाही – 9404530122_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here