Home 'आपली माणसं' शेतकऱ्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण! थकाबाई तलावात पाणी पोहोचले!

शेतकऱ्यांसाठी दिलेला शब्द पूर्ण! थकाबाई तलावात पाणी पोहोचले!

27
0

विजयभाऊ वडेट्टीवार यांनी स्वखर्चातून केली व्यवस्था, ३ ट्रॅक्टर पंप सुरू

सिंदेवाही:✍️ स्वामी गोलपल्लीवार मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

सिंदेवाही येथील थकाबाई तलावाच्या पाणी प्रश्नावर अखेर तोडगा निघाला आहे. काल थकाबाई तलाव परिसरात आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांची प्रत्यक्ष भेट होऊन गोसीखुर्दच्या सिंदेवाही वितरिकेतून पाणी उचलण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.

त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत स्वतःच्या खर्चातून पाणी उपसण्यासाठी आवश्यक व्यवस्था करून दिली. आज डिझेलवर चालणारे ट्रॅक्टरद्वारे संचालित तीन पंप सुरू करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून थकाबाई तलावात पाणी पोहोचले आहे.

उद्यापासून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू झाली आहे. पाण्याअभावी सुकत चाललेल्या पिकांना जीवदान मिळावे आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, या उदात्त हेतूने विजयभाऊ वडेट्टीवार साहेबांनी वेळेवर पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात मदतीला धावून आल्याबद्दल विजयभाऊंचे आभार व्यक्त केले जात आहे.

_शेतकरी जगला, तर शेती जगेल; शेती जगली, तर देश जगेल!_

*अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा*

*जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी*

*यासाठी संपर्क साधा.*

 

✍️ स्वामी गोलपल्लीवार

मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स

*9404530122*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here