Home 'शिक्षण व कला' बल्लारपूरच्या डॉ. गायत्री रामटेकेंना ‘कलारत्न पुरस्कार’; ‘मी सावित्री बोलतेय’ प्रयोगाने लातूर जिंकले

बल्लारपूरच्या डॉ. गायत्री रामटेकेंना ‘कलारत्न पुरस्कार’; ‘मी सावित्री बोलतेय’ प्रयोगाने लातूर जिंकले

20
0

🏆 चंद्रपूरचा अभिमान! 🏆

बल्लारपूरच्या डॉ. गायत्री रामटेकेंना ‘कलारत्न पुरस्कार’ 

 

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील सुप्रसिद्ध एकपात्री सादरकर्त्या डॉ. गायत्री अनिल कुमार रामटेके यांना ‘क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले कलारत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

माजी खासदार अॅड. प्रा. डॉ. सुनील गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र सोशल असोसिएशनच्या वतीने लातूर येथील भालचंद्र ब्लड बँक सभागृहात दि. 27 जून 2026 रोजी हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.

डॉ. गायत्री रामटेके या “मी रमाई बोलतेय”, “मी जिजाऊ बोलतेय”, “मी सावित्री बोलतेय” या एकपात्री प्रयोगांच्या माध्यमातून महामानवांचे कार्य घराघरात पोहोचवत आहेत. त्यांच्या या सामाजिक व सांस्कृतिक कार्याची दखल घेत सन्मानचिन्ह, शाल व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात आयोजित पारंपारिक कला महोत्सवात डॉ. रामटेके यांनी “मी सावित्री बोलतेय” या एकपात्री अभिनयाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले.

या सोहळ्याला स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र तांदळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, शिक्षक आमदार विक्रम काळे, सिने अभिनेत्री मैथिली वारंग, लावणी साम्राज्ञी स्वाती पुणेकर, बालकलाकार शिपा पवार उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मित्र असोसिएशनचे अध्यक्ष सुफी सय्यद समशोद्दिन यांनी केले होते. यावेळी पत्रकार संतोष सोनवणे, गीतांजली रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गायत्री रामटेके यांच्या या सन्मानामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

🏆 चंद्रपूरचा अभिमान! 🏆

बल्लारपूरच्या डॉ. गायत्री रामटेकेंना ‘कलारत्न पुरस्कार’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here