Home 'आपली माणसं' बल्लारपूर: वर्षावास प्रवचन मालिकेचे आम्रपाली बुद्ध विहारात दीपप्रज्वलनाने उद्घाटन

बल्लारपूर: वर्षावास प्रवचन मालिकेचे आम्रपाली बुद्ध विहारात दीपप्रज्वलनाने उद्घाटन

24
0
आयु. डॉ. गायत्री रामटेके यांच्या हस्ते वर्षावास प्रवचन मालिकेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन

 

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शहरातील 8 विहारांमध्ये 3 महिने धम्म प्रबोधन होणार

बल्लारपूर, 8 ऑगस्ट 2026 :
बौद्ध धम्मातील अत्यंत पवित्र काळ असलेल्या वर्षावासाची सुरुवात बल्लारपूर येथे झाली. आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या तीन महिन्यांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या वर्षावास प्रवचन मालिकेचे उद्घाटन आम्रपाली बुद्ध विहार, सात खोली वार्ड येथे दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
भारतीय बौद्ध महासभा, चंद्रपूर जिल्हा पश्चिम अंतर्गत बल्लारपूर शहरातील 8 बुद्ध विहारांमध्ये ही प्रवचन मालिका राबविण्यात येणार आहे.
प्रवचन मालिका होणारे 8 विहार:
1. पंचशील विहार
2. सांची बुद्ध विहार
3. भारतीय बौद्ध ज्ञान उदय मंडळ
4. सिद्धार्थ विहार पंचशील
5. बुद्ध सम्राट अशोक महाबोधी मंडळ
6. नवयुवक पंचशील बौद्ध मंडळ
7. असित विहार
8. आम्रपाली बुद्ध विहार
उद्घाटन कार्यक्रम
कार्यक्रमाचे उद्घाटन आयु. डॉ. गायत्री रामटेके, केंद्रीय शिक्षिका तथा बल्लारपूर शहराध्यक्ष यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आयु. अनुकलाताई वाघमारे होत्या तर स्वागताध्यक्ष प्रमिला रामटेके होत्या.
डॉ. गायत्री रामटेके यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्व, वर्षावास, गुरुपौर्णिमा व विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध यांच्या शिकवणीवर साध्या व सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शितल झाडे यांनी तर आभार प्रदर्शन शितल ताडे यांनी केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूरच्या वतीने विहाराला धम्मयान कॅलेंडर भेट देण्यात आले. कार्यक्रमाला शहरातील पदाधिकारी व बहुसंख्येने उपासक-उपासिका उपस्थित होत्या.

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा

जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here