—
*सिंदेवाही टाइम्स | आरोग्य विशेष*
*दिनांक: 15 जून 2026, सोमवार*
*प्रतिनिधी, सिंदेवाही*
70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. ‘वय वंदना कार्ड’ योजनेद्वारे आता प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वर्षाला 10 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य उपचार मिळणार आहेत.
*कोणाला मिळणार फायदा?*
ही योजना 70 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व नागरिकांसाठी आहे. यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. श्रीमंत असो वा गरीब, सर्वांना समान फायदा.
*काय कव्हर होणार?*
वय वंदना कार्डवर कॅन्सर, हृदयविकार, किडनी, ब्रेन-स्ट्रोक, बायपास, सांधेदुखी अशा महागड्या शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे आधीपासून असलेला आजार म्हणजे ‘Pre-existing disease’ पण कव्हर होतो. त्यामुळे कोणतीही Waiting Period नाही.
*कॅशलेस + पेपरलेस*
रुग्णालयात भरती होताना कोणतेही पैसे भरावे लागणार नाहीत. फक्त वय वंदना कार्ड किंवा आधार कार्ड दाखवा. उर्वरित प्रक्रिया हॉस्पिटलच करेल. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक ताण सहन करावा लागणार नाही.
*कार्ड कसं काढायचं?*
1. *मोबाईलवर:* ‘आयुष्मान अॅप’ डाऊनलोड करा. त्यावर बेनिफिशरी सर्च करून OTP टाका. सेल्फी काढून कार्ड जनरेट करा.
2. *ऑफलाइन:* जवळच्या जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा CSC सेंटरमध्ये जा. आधार कार्ड आणि फोटो घेऊन जा. तेथील कर्मचारी 10 मिनिटात कार्ड काढून देतील.
सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
*- स्वामी गोलपल्लीवार*
*मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स*
🎉 70+ आजी-आजोबांसाठी मोठी खुशखबर 🎉
वर्षाला 10 लाख रुपये पर्यंत मोफत उपचार!
‘वय वंदना कार्ड’ काढा आणि टेन्शन फ्री व्हा 💳
✅ उत्पन्नाची अट नाही
✅ कॅशलेस, पेपरलेस
✅ जुना आजार पण कव्हर
सिंदेवाहीतील ज्येष्ठांनी नक्की वाचा आणि शेअर करा 👇

