चंद्रपूर, दि. १९ :
✍️स्वामी गोलपल्लीवार मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
राजोली व परिसरातील नागरिकांच्या वीजविषयक अडचणी स्थानिक पातळीवरच जलद गतीने सुटाव्यात यासाठी मूल शहर व मूल ग्रामीण शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन *राजोली वीज वितरण केंद्र* निर्माण करण्यास अखेर मंजुरी देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी पत्राद्वारे ही माहिती आमदार सुधीर मुनगंटीवार यांना दिली असून, या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
मूलवर अवलंबित्व संपणार
आतापर्यंत राजोली व परिसरातील नागरिकांना वीजपुरवठा, नवीन वीज जोडणी, तांत्रिक बिघाड, देखभाल-दुरुस्ती आणि इतर सेवांसाठी मूल येथील कार्यालयावर अवलंबून राहावे लागत होते. यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
या पार्श्वभूमीवर राजोली येथे स्वतंत्र वीज वितरण केंद्र निर्माण करण्याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि महावितरणकडे सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत शासनाने हा निर्णय घेतला आहे.
नागरिकांना काय फायदा?
या नवीन स्वतंत्र केंद्रामुळे राजोली परिसरातील नागरिकांना वीज वितरणाशी संबंधित सर्व तक्रारी आणि सेवा आता स्थानिक पातळीवरच मिळणार आहेत. वीजपुरवठ्यातील अडथळे, नवीन कनेक्शन आणि ग्राहक सेवेच्या प्रश्नांचे जलद निराकरण होणार असून, नागरिकांना यापुढे आपल्या कामासाठी दूर मूलपर्यंत जावे लागणार नाही.
हा निर्णय राजोलीकरांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
#SindewahiTimes #Rajoli #Mool #SudhirMungantiwar #DevendraFadnavis #MSEDCL #Chandrapur #Mul
अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122
—


