Home मुख्य बातम्या गोसीखुर्दचे पाणी गडमौशी तलावात सोडा; सिंदेवाहीतील शेकडो शेतकऱ्यांची मागणी

गोसीखुर्दचे पाणी गडमौशी तलावात सोडा; सिंदेवाहीतील शेकडो शेतकऱ्यांची मागणी

21
0

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
सिंदेवाही तालुक्यातील गडमौशी, जाटलापूर, लोणवाहीसह 12 गावातील धान पिके पाण्याअभावी संकटात सापडली आहेत. यावर्षी अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.गोसीखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे पाणी गडमौशी लघु प्रकल्पाच्या पोटातून अंडरग्राउंड नहराद्वारे पुढे जात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळत नाही. त्यामुळे चारगाव (ब) / हजारीचक हद्दीत बसविलेल्या आउटलेट गेटमधून पाणी सोडून ते नैसर्गिक नाल्याद्वारे गडमौशी तलावात सोडावे, जेणेकरून परिसरातील सर्व पिके वाचतील आणि भूजल पातळीत वाढ होईल.या मागणीसाठी शेतकरी नेते मनोहर पवार यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी स्वाक्षरीचे निवेदन प्रशासनाला दिले. यावेळी विलास गंडाटे, अनिल बोरकर, किशोर भरडकर, अशोक भरडकर, देविदास बोरकर, दिलीप बोरकर, सतीश पवार व इतर शेतकरी उपस्थित होते.
#सिंदेवाहीटाईम्स #गोसीखुर्द #शेतकरीआंदोलन #चंद्रपूर #Sindewahi

अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.

✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here