सिंदेवाही: प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत सोलर सिस्टीमच्या ‘रिलीज ऑर्डर’साठी तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना सिंदेवाही महावितरण उपविभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता अमोद संतोष रंदये (वय 38) याला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सायंकाळी रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे महावितरण वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.नेमकं काय घडलं? तक्रारदाराने दोन ग्राहकांच्या घरी सोलर सिस्टीम बसवून दिली होती. या सिस्टीमचे महावितरणच्या मीटरवर कनेक्शन जोडण्यासाठी मंजुरी मिळावी, म्हणून ‘रिलीज ऑर्डर’ काढणे आवश्यक होते. हे काम करून देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमोद रंदये याने प्रत्येक ग्राहकामागे 2 हजार रुपये याप्रमाणे एकूण 4 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर तक्रारदाराने तीन हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने 1 जुलै रोजी ACB कडे तक्रार नोंदवली. तक्रार मिळताच ACB पथकाने सापळा रचून तीन हजार रुपये लाच स्वीकारताना रंदये याला अटक केली.ACB ची तत्पर कारवाई: चंद्रपूर ACB च्या पथकाने बुधवारी सायंकाळी सिंदेवाही महावितरण कार्यालयातच ही कारवाई केली. रंगेहाथ पकडल्याने अभियंता रंदये याची चांगलीच भंबेरी उडाली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.PM सूर्यघर योजनेला काळिमा: केंद्र सरकारची महत्वाकांक्षी PM सूर्यघर मोफत वीज योजना सर्वसामान्यांना मोफत सोलर देणारी आहे. पण सिंदेवाहीतील या घटनेमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासकीय कर्मचारीच योजनेत अडथळा आणत असतील तर सर्वसामान्यांनी जायचे कुठे, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
#SindewahiTimes #ACBTrap #MSCB #PMSuryaGhar #Corruption #Chandrapur #Saoli
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स …..
9404530122

