Home चंद्रपूर जिल्हा सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

3
0
सिंदेवाही तहसीलदार यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे निवेदन सादर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ. दि. 15/07/2026

– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाइम्स

सिंदेवाही, 15 जुलै 2026: सिंदेवाही तालुक्यात अत्यल्प पावसामुळे गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व नागरिकांना तातडीचा दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दामोदर नन्नावार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले.

निवेदनातील मुख्य मुद्दे:
1.दुष्काळ घोषणा: सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा.
2.शेती संकट: पावसाअभावी धानाची रोपे सुकत आहेत. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.
3.आर्थिक मदत: दुबार पेरणीसाठी विशेष आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाई तातडीने द्यावी.
4.कर्जमाफी: शेतकऱ्यांना कर्जमाफी व कर्जपुनर्गठनाचा लाभ द्यावा.
5.धानाला हमीभाव: धानाला ₹3500 ते ₹4000 प्रति क्विंटल हमीभाव द्यावा.
6.इतर मागण्या: स्मार्ट मीटर सक्ती थांबवावी, शेतीला नियमित वीज, रस्ते दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रोजगारनिर्मिती आणि आरोग्य सेवा सक्षम करावी.

निवेदन सादर करताना उपस्थित:चंद्रभूषण जैस्वाल, प्रकाश बन्सोड, राजू वानखेडे, नागराज मेश्राम, ज्ञानेश्वर हांडेकर, आरिफ शेख, विजय जांभुळे, स्वप्नील कारमेंघे, सलीम पठाण, सुमेश नागदेवते, जगदीश मेश्राम, मनोज गरमळे, अजय लोणबले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

🌾 शेतकऱ्यांचा आक्रोश🌾
सिंदेवाही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा!
अत्यल्प पावसामुळे धानाची रोपे सुकली.
दुबार पेरणीचे संकट.
शेतकरी आर्थिक अडचणीत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दामोदर नन्नावार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्र्यांना निवेदन.
मागणी: कर्जमाफी, हमीभाव 4000/-, पीकविमा, नियमित वीज

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here