
सिंदेवाही । प्रतिनिधी
स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी कारभार आणि NEET पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सिंदेवाही तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकार विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकारी विद्यार्थी आणि युवकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचा निषेध म्हणून हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनाला ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यनिष्ठ आमदार आदरणीय श्री. विजयभाऊ वडेट्टीवार साहेब प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी सिंदेवाही तालुक्यातील समस्त काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सर्वांच्या सहभागामुळे आंदोलन यशस्वी झाले.
आंदोलकांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #NEET #PaperLeak #VijayWadettiwar #Congress #Sindavahi #DharmendraPradhan
