Home मुख्य बातम्या पी.एम. श्री राजोली शाळेचे 7 विद्यार्थी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

पी.एम. श्री राजोली शाळेचे 7 विद्यार्थी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण

17
0

राजोली । प्रतिनिधी
पी.एम. श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजोली च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. शाळेतील 7 विद्यार्थी या परीक्षेत पात्र ठरले असून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.गुणवंत विद्यार्थ्यांची नावे:कु. आरोही संदीप रामटेके कु. गाथा गोविंदा ठिकरे चि. हेमेष अरविंद भांडारकर कु. मयुरी हेमलाल लांजेवार चि. प्रत्युष अमित कुंभार कु. स्वरा अतुल मंचमवार कु. वैष्णवी पुरुषोत्तम सिडाम शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद आणि पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. “मेहनत आजची… यश उद्याचे!” या ब्रीदाने विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मन:पूर्वक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Rajoli #ScholarshipExam #PMSHRI #Education #Chandrapur #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here