Home चंद्रपूर जिल्हा नवरगावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: रत्नापूर फाट्यावर दोन दुकाने फोडली, एका दुकानात प्रयत्न...

नवरगावात भुरट्या चोरांचा सुळसुळाट: रत्नापूर फाट्यावर दोन दुकाने फोडली, एका दुकानात प्रयत्न अयशस्वी

20
0

सिंदेवाही । प्रतिनिधी
नवरगाव परिसरात भुरट्या चोरांनी डोके वर काढले असून सिंदेवाही-नवरगाव-चिमूर मुख्य राज्यमार्गावरील रत्नापूर फाट्यावर दोन दुकाने फोडून साहित्य व रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. तर एका दुकानात चोरीचा प्रयत्न असफल ठरला. ऐन राज्यमार्गावर घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काय घडले?
शनिवारी रात्री नेहमीप्रमाणे व्यावसायिक आपली दुकाने बंद करून घरी गेले होते. रविवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास दुकाने उघडण्यासाठी आले असता हा चोरीचा प्रकार समोर आला.चोरट्यांनी धनश्याम सोनकुसरे यांच्या ‘स्नेहांकित जनरल स्टोअर्स’ चे दार उघडून आतिल चिल्लर पैसे चोरून नेले. त्यांच्याच शेजारी असणाऱ्या रागिणी आबाजी मडावी व गयाबाई गुलाब आत्राम यांच्या ‘झुणका भाकर केंद्रा’ मध्येही चोरट्यांनी ताव मारला. केंद्रातील तेल, तिखट, मीठ आणि पिठासह सर्वच खाद्य साहित्य चोरट्यांनी पळवून नेले. यामुळे त्यांचे सुमारे 4 ते 5 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.तिसऱ्या दुकानात प्रयत्न निष्फळयानंतर चोरट्यांनी राजू बावणे यांच्या ‘महाकाल इडली डोसा सेंटर’ कडे मोर्चा वळवला. दुकानाची मागील बाजूची कपड्याची जाळी फोडून आत प्रवेश केला. मात्र, आतिल लाकडी बॉक्सचे कुलूप न तुटल्यामुळे किंवा कोणाची तरी चाहूल लागल्यामुळे चोरट्यांनी तिथून पोबारा केला. त्यामुळे येथील साहित्य वाचले.पोलिसांकडून तपास सुरू घटना उघडकीस आल्यानंतर याची माहिती नवरगाव पोलीस प्रशासनाला देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.या घटनेमुळे रत्नापूर फाट्यावरील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.
– स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
TAGS: #Navargaon #Theft #ChandrapurPolice #Crime #SindavahiTimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here