Home चंद्रपूर जिल्हा FDA आयुक्त तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर: 3 दिवसांत 53 धाडी, 33 भेसळखोर...

FDA आयुक्त तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर: 3 दिवसांत 53 धाडी, 33 भेसळखोर जेरबंद

31
0
#FDAAction #TukaramMundhe #SindewahiTimes

⚠️ जनहितार्थ जारी ⚠️

स्वामी गोलपल्लीवार

मुंबई/सिंदेवाही: अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत राज्यभरात धडक कारवाईचा धडाका लावला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोर आणि नियमबाह्य गुटखा विक्रेत्यांविरोधात कडक पावले उचलत, 53 ठिकाणी अचानक धाडी टाकून 33 जणांना अटक करण्यात आली आहे.

सिंदेवाही कनेक्शन: चंद्रपूर जिल्हा हा गुटखा तस्करीसाठी संवेदनशील मानला जातो. तुकाराम मुंढे यांच्या या कारवाईमुळे सिंदेवाही, ब्रह्मपुरी, नागभिड परिसरातील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. स्थानिक FDA अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंदेवाही टाइम्स आवाहन: तुमच्या परिसरात भेसळयुक्त पदार्थ किंवा अवैध गुटखा विक्री होत असेल तर FDA हेल्पलाईन 1800-222-365 वर तक्रार करा.

🚨 सिंदेवाही टाइम्स ब्रेकिंग 🚨

FDA आयुक्त तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर
3 दिवस = 53 धाडी = 33 अटक

भेसळखोरांनो सावधान!
नियमबाह्य गुटखा विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा

जनतेच्या आरोग्याशी नो कॉम्प्रमाईज 💪
#SindewahiTimes

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here