Home क्राईम बातम्या बल्लारपूर: लाखोंची देशी-विदेशी दारू जप्त; एका आरोपीला अटक टाटा इंडिगो कारमधून 3...

बल्लारपूर: लाखोंची देशी-विदेशी दारू जप्त; एका आरोपीला अटक टाटा इंडिगो कारमधून 3 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; बल्लारपूर पोलिसांची मोठी कारवाई

38
0
बल्लारपूर पोलिसांनी जप्त केलेली दारू आणि आरोपीसह पोलिस पथक

बल्लारपूर, 8 ऑगस्ट 2026 :- प्रतिनिधी
सिंदेवाही टाईम्स

बल्लारपूर पोलिसांनी अवैध दारू तस्करीविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका कारमधून लाखोंचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करून वाहनासह एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राजीव प्रसाद वार्ड येथील मक्का मशीद ते नाग मंदिरकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी करण्यात आली. यावेळी टाटा कंपनीची इंडिगो मंझा कार क्रमांक MH 34 AE 6906 ची तपासणी केली असता त्यात विविध ब्रँडच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या.

चौकशीत आरोपीने आपले नाव ख्वाजा शेख उर्फ बडे मोहम्मद शेख, वय 42 वर्षे, रा. साईंबाबा वार्ड, भेंडे नाला, बल्लारपूर असे सांगितले.

पोलिसांनी जप्त केलेल्या दारू व वाहनाची एकूण किंमत 3 लाख 28 हजार 70 रुपये आहे. याप्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.


अशाच स्थानिक बातम्यांसाठी सिंदेवाही टाईम्स ला फॉलो करा
जाहिराती | बातम्या | विशेष लेख | प्रसिद्धीपत्रके | कार्यक्रम प्रसिद्धी
यासाठी संपर्क साधा.
✍️स्वामी गोलपल्लीवार
मुख्य संपादक, सिंदेवाही टाईम्स
9404530122

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here